♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशन, चंद्रपूर
निवडणूक जाहीरनामा – २०२६
“वकिलांचा सन्मान, सुविधा-सशक्तीकरण आणि सुरक्षित भविष्य घडविण्यासाठी कटिबद्ध – एक विजनरी पॅनेल”
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
🔹 आमचा दृष्टिकोन (Vision)
आजच्या वास्तव गरजांना उत्तर देत, उद्याच्या आव्हानांना सामोरे जाण्यास सज्ज असलेली आधुनिक • डिजिटल • सशक्त • सुरक्षित बार असोसिएशन उभी करणे – हाच आमचा ध्यास, हाच आमचा संकल्प.
बार असोसिएशन म्हणजे केवळ एक संस्था नाही, ती अधिवक्त्यांचा आत्मसन्मान, सुरक्षितता आणि भविष्याचा कणा आहे – आणि तो कणा अधिक मजबूत करणे हेच आमचे ध्येय आहे.
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
🔹 माननीय अधिवक्त्यांसाठी प्रस्तावित ठोस मागण्या व उपक्रम
➡️नवीन विस्तारित इमारतीमध्ये प्रत्येक अधिवक्त्यासाठी स्वतंत्र, सुसज्ज व सन्माननीय बसण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी ठोस पाठपुरावा
➡️ केंद्र शासनाकडून स्वतंत्र ‘Advocate Building’ मंजूर करून घेण्यासाठी सातत्यपूर्ण मागणी
➡️ फक्त अधिवक्त्यांसाठी टू-व्हीलर व फोर-व्हीलर रिझर्व पार्किंग सुविधा ➡️ज्युनियर अधिवक्त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्टडी सर्कलची स्थापना • JMFC व Civil Judge (Junior Division) परीक्षा मार्गदर्शन • AIBE परीक्षेसाठी विशेष तयारी वर्ग
➡️अधिवक्त्यांसाठी केंद्र शासन पुरस्कृत Group Insurance Scheme लागू करून घेण्यासाठी प्रभावी प्रयत्न
➡️ जिल्हा बार असोसिएशन ग्रंथालयाचे संपूर्ण संगणकीकरण व आधुनिकीकरण
➡️ बार असोसिएशन कार्यालयाचे १००% डिजिटायझेशन – पारदर्शक व कार्यक्षम प्रशासनासाठी
➡️नवीन इमारतीत अधिवक्त्यांसाठी स्वतंत्र अभ्यासिका (Reading Room)
➡️ अधिवक्त्यांसाठी Financial Management & Financial Literacy Program
➡️ चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशनसाठी स्वतंत्र रुग्णवाहिका (Ambulance) मागणी
➡️ Advocate Protection Bill साठी ठाम समर्थन व मागणी
➡️ नवीन इमारतीत अधिवक्त्यांसाठी Recreational Club साठी स्वतंत्र कक्ष मागणी
➡️अधिवक्त्यांच्या पाल्यांसाठी Career Guidance Program
इयत्ता 10वी, 12वी व पदवी स्तरावरील गुणवंत अधिवक्त्यांच्या पाल्यांचा सन्मान सोहळा
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
🔹 आम्ही फक्त बोललो नाही – आम्ही करून दाखवले आहे
➡️चॅरिटी कमिशनर कार्यालय, चंद्रपूर येथे अधिवक्त्यांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था मिळवून दिली व त्याचे विधिवत उद्घाटन माननीय जिल्हा न्यायाधीश यांच्या हस्ते करून घेतले ➡️बार असोसिएशन ग्रंथालयात ५ संगणक व प्रिंटरची सुविधा उपलब्ध करून दिली
➡️ न्यायालयातील ९ खोल्यांसाठी रंगीत व क्रमांकित ओळख पाट्या तयार करून लावल्या
➡️अधिवक्त्यांना बॅग ठेवायला रॅक बसविल्या.
➡️ अधिवक्त्यांसाठी commode seat टॉयलेट तयार केले.
➡️ न्यायालयाच्या विस्तारित इमारतीचा प्रस्ताव पूर्ण करून त्याचे विधिवत उद्घाटन करून घेतले
➡️ अधिवक्त्यांचे बस्ते वाहून नेण्यासाठी स्वतंत्र ट्रॉली व्यवस्था कार्यान्वित केली
➡️बार कार्यालयातील फाइल्स विषयानुसार वर्गीकृत व सुव्यवस्थित केल्या
➡️महिला अधिवक्त्यांसाठी भव्य आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन
➡️पोस्ट ऑफिसच्या सहकार्याने प्रत्येक अधिवक्त्याचा विमा करून दिला
➡️ पक्षकार व गरजू अधिवक्त्यांसाठी व्हीलचेअर सुविधा उपलब्ध करून दिली
➡️आमदार महोदयांच्या माध्यमातून ₹50,000 किमतीची कायदेशीर पुस्तके प्राप्त केली
➡️ नवोदित अधिवक्त्यांसाठी स्व. ॲड. दादाजी देशकर व स्व. ॲड. प्रमोद आनंद यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ११ विषयांवरील व्याख्यानमालेचे यशस्वी आयोजन
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
🔹 आमची ठाम बांधिलकी
🔸 अधिवक्त्यांचा सन्मान, सुरक्षितता व सुविधा – आमचे सर्वोच्च प्राधान्य 🔸 ज्युनियर व महिला अधिवक्त्यांचे विशेष सक्षमीकरण
🔸 बार असोसिएशनला आधुनिक, पारदर्शक व डिजिटल बनविण्याचा निर्धार
🔸 सामाजिक उत्तरदायित्व, कल्याणकारी उपक्रम व मानवी संवेदनशीलतेला प्राधान्य
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
“काम बोलते – आश्वासन नाही, अनुभव आमची ओळख”
विजनरी नेतृत्व | सिद्ध कामगिरी | सशक्त आणि सुरक्षित भविष्य
चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशन निवडणूक – २०२६
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
नमस्कार🙏
आपले विचार, आपल्या भावना समजून घेणा-या…..
आपल्या उत्थानासाठी झटणा-या…..
समर्थपणे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व शासनाकडे आपली बाजू मांडू शकणा-या आपल्या माणसांचा शोध घेताय नं…
मग आता ती संधी मिळतेय.
दि. 09/01/2026 रोजी होणा-या आपल्या बार असोसिएशनच्या निवडणुकीत…
या👇 ‘आपल्या पॅनलला’ मतदान करा निश्चिंत व्हा….

- अध्यक्ष: ॲड. विक्रम टंडन
- उपाध्यक्ष: ॲड. अमन मारेकर
- सचिव: ॲड. अभिजीत किन्हीकर
- सहसचिव: ॲड. तृप्ती मांडवगडे
- कोषाध्यक्ष: ॲड. मुर्लीधर बावनकर
- ग्रंथपाल: ॲड. राहुल थोरात
महिला राखीव गट – सदस्य:
- ॲड. सरोज कदम
- ॲड. राजलक्ष्मी रामटेके
- ॲड. महेश्वरी सोनुले
सदस्य:
- ॲड. सपना शेट्टी
- ॲड. आकाश गिरी
- ॲड. वर्षा उपाध्याय
- ॲड. शरीफ मिर्जा
- ॲड. स्वाती समर्थ
- ॲड. तोषित किन्नाके
- ॲड. सुरेश दुर्गम
- ॲड. अमोल वैद्य
- ॲड. मनोज मिश्रा
- ॲड. उमेश बागेसर
- ॲड. सोपान जवंजार
- ॲड. प्रतिभा येलेकर
निवडणूक दिनांक: 09/01/2026
वेळ: सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत.
स्थान : जिल्हा व सत्र न्यायालय, चंद्रपूर
आपले बहुमूल्य मत देऊन सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा..
BE(MECHANICAL) , LL.B. , LL.M. , PG.D.T.L.

