सर्वोदय कल्याणकारी युवा व महिला मंचाने संयुक्त वतीने जनजागृती उपक्रम आयोजित केले

SARVODAY KALYANKARI YUBA ANI MAHILA MANCH

दिनांक १६ ऑक्टोबर २०२५ रोजी, धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्ताने विधी विद्यार्थी संघटना आणि सर्वोदय कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था, चंद्रपूर यांच्या स्वतंत्र युवा व महिला मंचतर्फे विधी जनजागृती अभियान तसेच अल्पोहार व पाणी वाटपाचा कार्यक्रम चांदा क्लब ग्राउंड येथे आयोजित करण्यात आला.

धम्मचक्र प्रवर्तन दिन हा भारतीय इतिहासातील एक अत्यंत पवित्र आणि परिवर्तनकारी दिवस आहे. या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथील दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित नवा सामाजिक मार्ग दाखविला. भगवान गौतम बुद्धांच्या करुणा, प्रज्ञा आणि मध्यम मार्गाच्या तत्वज्ञानाने प्रेरित होऊन समाजात मानवता, शांतता आणि कायद्याचा आदर यांचे संवर्धन करण्याचा संदेश या दिवसातून दिला जातो.

कार्यक्रमाचे उद्घाटन चंद्रपूर जिल्हा न्यायालयातील माननीय न्यायाधीशांच्या हस्ते करण्यात आले. सन्माननीय न्यायाधीशांनी आयोजकांचे मार्गदर्शन केले व पुढील उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या. सर्व नागरिकांनी कार्यक्रमासाठी उत्साहाने सहभाग नोंदविला.

या कार्यक्रमाच्या आयोजनात प्रमुख्याने सहभागी झालेले अधिवक्ता एड. हेमराज कि. काबलिया (उपाध्यक्ष, सर्वोदय कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था, चंद्रपूर), देवेंद्र काबलिया, एड. स्वाती कांबळे, एड. रोशनी कांबळे, एड. आशीष रायपुरे, एड. तबस्सुम शेख, एड. अतुल बामबोडे, एड. ऋषिकेश मंडपे, एड. दीपा मून व इतर अधिवक्ता तसेच अमित भटकार (विधी विद्यार्थी संघटना, चंद्रपूर) आणि सिकल सेल वॉरियर्स यांनी सक्रिय सहभाग घेतला.

कार्यक्रमासाठी प्रामुख्याने उपस्थित असलेले युवा अधिवक्ता एड. आशिषजी मुंधडा होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन एड. महेंद्रजी असरेट यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *